बहुप्रतीक्षित आणि Latest Vivo X100 आणि Vivo X100 Pro फोन Launch, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स। Tech News

Updated on 14-Nov-2023
HIGHLIGHTS

सिरीजमध्ये Vivo X100 आणि Vivo X100 Pro मॉडेल समाविष्ट केले आहेत.

या नवीन स्मार्टफोन सिरीजसोबत कंपनीने Vivo Watch 3 देखील लाँच केली आहे.

दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे.

मागील काही काळापासून टेक विश्वात Vivo च्या आगामी जबरदस्त सिरीजबद्दल बरीच चर्चा रंगली होती. होय, Vivo X100 सिरीज अखेर लाँच झाली आहे. कंपनीने या सिरीजमध्ये Vivo X100 आणि Vivo X100 Pro मॉडेल समाविष्ट केले आहेत. एवढेच नाही, तर या नवीन स्मार्टफोन सिरीजसोबत कंपनीने Vivo Watch 3 देखील लाँच केली आहे. या फोनची किंमत आणि सर्व माहिती तपशिलवार जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Free चे दिवस गेले! WhatsApp युजर्सच्या खिशावर पडणार ताण, App चालवायला द्यावे लागतील पैसे? Tech News

Vivo X100 आणि X100 Pro ची किंमत

आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने सध्या चीनमध्ये Vivo X100 सीरीज लाँच केली आहे. Vivo X100 ची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 46,383 रुपयांपासून सुरू होते. तर या फोनच्या प्रो वेरिएंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 57,980 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही फोन तुम्हाला चार रंगाच्या पर्यायांसह खरेदी करता येतील. ज्यामध्ये Star Trail Blue, Sunset Orange, White Moonlight आणि Cheyne Black कलरचे पर्याय उपलब्ध आहेत.

Vivo X100 आणि X100 Pro

Vivo X100 आणि Vivo X100 Pro स्मार्टफोन समान फीचर्ससह सुसज्ज आहेत.

डिस्प्ले

दोन्ही फोनमध्ये कंपनीने 6.78 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आहे, तर प्रो मॉडेलमध्ये कर्व एज आहेत.

प्रोसेसर

दोन्ही फोन MediaTek Dimensity 9300 प्रोसेसरने सुसज्ज आहेत, ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

बॅटरी

Vivo X100 मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासह 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Vivo X100 Pro मध्ये 5,400mAh बॅटरी आहे, ज्यासह 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. प्रो व्हेरियंटमध्ये 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासह OIS सपोर्ट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, कॅमेरा सेटअपमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. यात 64MP पेरिस्कोप सेन्सर देखील आहे, जो 3X आणि 100X डिजिटल झूमला सपोर्ट करतो.

तर , प्रो मॉडेलमध्ये 50MP पेरिस्कोप लेन्स आहे. फोनचे कॅमेरे ZEISS प्रमाणित आहेत. दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :