बहुप्रतीक्षित Vivo X100 सीरीजची भारतातील लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. होय, नवीन वर्षाची सुरुवात भारतीय टेक विश्वात अगदी जबरदस्त होणार आहे. कारण, Vivo X100 सिरीज भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच करण्यात येणार आहे. या सिरीज अंतर्गत Vivo X100 आणि Vivo X100 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले जाणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या सिरीजमध्ये यूजर्सना अपडेटेड कॅमेऱ्यापासून पॉवरफुल बॅटरी आणि उत्कृष्ट डिस्प्लेपर्यंत सर्व काही मिळेल. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन लाइनअप भारतापूर्वी चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: Lava Year End Sale: देशी कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय प्रचंड Discount, अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Vivo India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत Vivo X100 सीरीजची लाँच डेट जाहीर केली आहे. होय, ही सिरीज भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होईल. या लाइनअपचा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंटवर पाहता येईल.
लीकनुसार Vivo X100 सीरीजच्या बेस मॉडेलची म्हणजेच Vivo X100 ची सुरुवातीची किंमत सुमारे 45,990 रुपये असण्याची शक्यता आहे. तर, Vivo X100 Pro 5G ची किंमत 60 हजार रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. मात्र, सिरीजची भारतीय किंमत लाँच इव्हेंटनंतरच पुढे येईल.
वर सांगितल्याप्रमाणे, Vivo X100 सिरीज आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यानुसार, स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीच्या स्क्रीन साईजसह कर्व डिस्प्ले मिळेल, ज्यांचा रीफ्रेश रेट 120Hz असेल. हे स्मार्टफोन्स MediaTek Dimensity 9300 चिपसह येतील. फोटोग्राफीसाठी, दोन्ही मोबाईल फोनमध्ये Zeiss ब्रँडसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. तर, यात V3 इमेजिंग चिप आणि 8T LTPO डिस्प्ले देखील प्रदान केला जाईल.
इतर स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo X100 मध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर, टॉप मॉडेलमध्ये 5400mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 120W फास्ट चार्जिंगसह मिळेल. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, ड्युअल सिम, ब्लूटूथ आवृत्ती 5.1, GPS, USB टाइप-C पोर्ट इ. फीचर्स मिळतील.