Vivo X100 सिरीज ग्लोबल मार्केटमध्ये लाँच, लोकप्रिय iPhone 15 ला देणार जबरदस्त  स्पर्धा? Tech News 

Vivo X100 सिरीज ग्लोबल मार्केटमध्ये लाँच, लोकप्रिय iPhone 15 ला देणार जबरदस्त  स्पर्धा? Tech News 
HIGHLIGHTS

Vivo ने आपली Vivo X100 सीरीज जागतिक बाजारात लाँच केली आहे.

फोनमध्ये डायमेंसिटी 9300 प्रोसेसर उपलब्ध आहे.

vivo x100 pro मध्ये 50MP 1-इंच लांबीचा IMX989 सेन्सर आहे.

दीर्घ प्रतीक्षेनंतर Vivo ने आपली Vivo X100 सीरीज जागतिक बाजारात लाँच केली आहे. मात्र, हा फोन इतर मार्केटमध्ये कधी लाँच होणार? याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo X100 आणि Vivo X100 Pro स्मार्टफोन चीनी बाजारात नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. बघुयात फोनचे पॉवरफुल स्पेक्स आणि शानदार फीचर्स.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro

Vivo X100 Pro आणि Vivo X100 स्मार्टफोन्सचे स्पेक्स एकसमानच आहेत. फोनचे सर्व तपशील पुढीलप्रमाणे:

Vivo X100 Pro+ leaked
Vivo X100 Pro

डिस्प्ले

या फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, पंच-होल कटआउटमध्ये फ्रंट कॅमेरा स्थापित करण्यात आला आहे.

प्रोसेसर

या दोन्ही फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी डायमेंसिटी 9300 प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, हे स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित FuntouchOS 14 वर फोन सादर केले गेले आहेत.

स्टोरेज

Vivo X100 सीरिजमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत. Vivo च्या व्हेरिएंट्सबद्दल बोलायचे झाले तर या सर्व मॉडेल्सच्या किमती नंतर जाहीर केल्या जातील, असे सांगितले जात आहे.

Vivo X100 Pro launched
Vivo X100

कॅमेरा

Vivo X100 Pro बद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP 1-इंच लांबीचा IMX989 सेन्सर आहे. याशिवाय, फोनमध्ये आणखी एक 50MP सेंसर आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स देखील आहे. Vivo X100 या फोनमध्ये 50MP सेंसर आणि आणखी एक 64MP सेंसर आहे.

बॅटरी

Vivo X100 या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 120W वायर्ड चार्जिंगसह येते. यासह ही बॅटरी लवकरात लवकर चार्ज होईल आणि मूलभूत कार्यांसह जास्तीत जास्त दोन दिवसांपर्यंत टिकण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo