Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची आज पहिली Sale, लेटेस्ट स्मार्टफोन सवलतींसह खरेदी करण्याची संधी। Tech News 

Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची आज पहिली Sale, लेटेस्ट स्मार्टफोन सवलतींसह खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची सेल Flipkart वर सुरु

SBI क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 6,399 रुपयांची सूट

नवीन डिव्हाइसमध्ये जलद चार्जिंगसाठी सपोर्टसह पॉवरफूल बॅटरी आहे.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro मागील आठवड्यात भारतीय बाजारात सादर करण्यात आले होते. त्यानंतर आज म्हणजेच 11 जानेवारी रोजी या दोन्ही स्मार्टफोनची पहिली सेल आहे. ही सेल प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर LIVE झाली आहे. या फोनवर बंपर डिस्काउंट देखील दिले जात आहेत. विशेष म्हणजे नवीन डिव्हाइसमध्ये जलद चार्जिंगसाठी सपोर्टसह पॉवरफूल बॅटरी आहे. चला तर मग बघुयात Vivo X100 सिरीजची किंमत आणि पहिल्या सेलमधील ऑफर्स –

Vivo X100

Vivo X100 सिरीजची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo X100 सिरीजचे दोन्ही फोन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Vivo X100 ची सुरुवातीची किंमत 63,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 6,399 रुपयांची सूट मिळणार आहे. तर, Axis बँकेकडून खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय 2,667 रुपयांची EMI आणि 26,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

त्याबरोबरच, Vivo X100 Pro ची किंमत 89,999 रुपये आहे. उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC आणि SBI बँकेकडून फोनवर 8,999 रुपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन 3,750 रुपयांच्या EMI सोबत 28,300 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Vivo-X100-Pro-camera
Vivo X100 Pro

Vivo X100 Series चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X100 आणि Vivo X100 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. हे दोन्ही फोन Android 14 वर काम करतात.

फोटोग्राफीसाठी, Vivo X100 मध्ये 50MP मेन सेन्सर, 64MP पेरिस्कोप लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. त्याच्या प्रो व्हेरियंटमध्ये म्हणजेच X100 Pro मध्ये तिन्ही लेन्स 50MP सह उपलब्ध आहेत. तसेच, दोन्ही हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo X100 मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, Vivo X100 Pro मध्ये 5,400mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी, दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo