Vivo ने अलीकडेच 14 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये Vivo X100 आणि X100 Pro लाँच केले. आता या फोन्सच्या ग्लोबल लाँचचा तपशील समोर आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार हा स्मार्टफोन 14 डिसेंबर 2023 रोजी जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. Vivo ने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर Vivo X100 आणि X100 Pro लॉन्च स्ट्रीम करणे अपेक्षित आहे. चला तर मग फार वेळ न घालवता जाणून घेऊयात आगामी फोनची अपेक्षित किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: लोकप्रिय Nothing Phone 2 वर मिळतोय तब्बल 13 हजार रुपयांचा Discount, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News
Vivo X100 आणि X100 Pro गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झाले होते. Vivo X100 ची चीनमध्ये किंमत 3,999 युआन म्हणजेच अंदाजे 45,600 रुपयांमध्ये होती. तर, जागतिक किमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी ती या किमतीच्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे.
हा स्मार्टफोन चीनमध्ये ब्लॅक, स्टार ट्रेल ब्लू, सनसेट ऑरेंज आणि व्हाईट मूनलाइट अशा चार कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र, Vivo ने अद्याप भारतात X100 सिरीजची अधिकृत लाँच तारीख उघड केलेली नाही.
हा फोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Vivo X100 आणि X100 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. कंपनीने दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 Octacore प्रोसेसर वापरला आहे. या दोन्ही उपकरणांमध्ये 16GB पर्यंत LPDDR5T RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी X100 Pro मध्ये Sony IMX989 लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर आणि 4.3x ऑप्टिकल झूम देणारी 50MP Zeiss लेन्स आहे. दोन्ही उपकरणे 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. Vivo X100 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जी 100W चार्जरला सपोर्ट करते. तर, X100 Pro मध्ये कंपनीने 5400 mAh बॅटरी आणि 120W वायर्ड चार्जर प्रदान केला आहे.