नव्या रंगरूपात लाँच झाला नवा Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स 

नव्या रंगरूपात लाँच झाला नवा Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स 
HIGHLIGHTS

Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन एका नवीन अवतारात लाँच

Vivo X Fold3 Pro फोन आधी फक्त सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होता.

Vivo X Fold3 Pro भारतातील सर्वात हलका फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Vivo ने आपला लेटेस्ट Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन एका नवीन अवतारात लाँच केला आहे. आता हा फोन एका नवीन मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे, असे म्हणायला देखील हरकत नाही. हे स्मार्टफोनचे नवे Lunar White Color मॉडेल आहे. खरं तर, Vivo X Fold 3 Pro स्मार्टफोन आधी फक्त एकाच मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु आता तुमच्यासाठी एक नवीन पर्याय देखील उपलब्ध झाला आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन Vivo चा जबरदस्त फोल्डेबल फोन म्हणून जून महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. आतापर्यंत हा फोन फक्त सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होता. Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन Lunar White Color मॉडेल हा मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे, जो सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.

Also Read: Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite ची सेल भारतात सुरु, पहिल्या विक्रीत भारी ऑफर्सचा वर्षाव!

Vivo X Fold3 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Vivo X Fold3 Pro च्या 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,59,999 रुपये आहे. HDFC बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10% झटपट सूट दिली जात आहे. तसेच, फोनचा EMI दरमहा 6,666 रुपयांपासून सुरू होतो. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 26 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. त्याचा नवीन प्रकार Vivo India Store, Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Vivo X Fold3 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X Fold3 Pro फोन ड्युअल-डिस्प्ले सेटअपमध्ये येतो. यात 8.03 इंच अंतर्गत AMOLED डिस्प्ले आहे. 6.53 इंच कव्हर डिस्प्ले देखील समाविष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. त्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 50 MP टेलिफोटो कॅमेरा आणि 50MP कॅमेरा सेन्सर सपोर्ट उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP सेन्सर उपलब्ध आहे. फोनमध्ये ZEISS इंजिनियर इमेजिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Vivo X Fold3 Pro smartphone in lunar white color varient

फोनमध्ये Google AI टूल्स सपोर्ट आहेत. यात AI नोट असिस्ट, AI स्क्रीन ट्रान्सलेशन आणि AI ट्रान्सक्रिप्ट सारखे फीचर्स असतील. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5700mAh बॅटरी आहे. फोन 100W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येतो. तसेच, 50W वायरलेस फ्लॅश चार्ज सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात हलका फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo