Xiaomi आणि Samsung नंतर आता Vivo देखील आपला नवीन फोल्डेबल फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. Vivo ने आपला पहिला फोल्डेबल फोन Vivo X Fold या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच केला होता. कंपनीचा हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 8.03 इंच डिस्प्लेने सुसज्ज होता. कंपनी आता नवीन हार्डवेअरसह आपला अपग्रेड केलेला फोल्डेबल फोन Vivo X Fold S आणण्याची तयारी करत आहे, अशी माहिती काही अहवालातून मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! OnePlus 9 Pro फोन झाला स्वस्त, जाणून घ्या स्मार्टफोनची नवी किंमत
फोनच्या लाँच डेटबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने खुलासा केला आहे की, हा फोन लवकरच चीनमध्ये लाँच केला जाईल. टिपस्टरने लीकमध्ये या आगामी फोनच्या काही खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचीही माहिती दिली आहे.
Tipster Digital Chat Station नुसार, कंपनी या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देऊ शकते. फोनचा डिस्प्ले मागील वेरिएंट प्रमाणे 8.03 इंच असू शकतो. हा एक AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय, कंपनी फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.53-इंच फुल एचडी + AMOLED कव्हर डिस्प्ले देखील देऊ शकते.
कंपनी Vivo X Fold S मध्ये 4700mAh बॅटरी देऊ शकते. टिपस्टरनुसार, फोनमध्ये दिलेली ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिसू शकतो. यात 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 12-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 8-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्सचा समावेश असू शकतो. तर, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे.