8-इंच डिस्प्लेसह Vivo चा नवीन फोल्डेबल फोन लाँच, मिळेल 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग
Vivo X Fold+ कंपनीचा नवीन स्मार्टफोन लाँच
फोनमध्ये तुम्हाला 8 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल
फोन 12GB+256GB आणि 12GB+512GB या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
Vivo ने आपला नवीन फोल्डेबल फोन Vivo X Fold+ बाजारात लाँच केला आहे. फोनमध्ये 8.03-इंच आतील आणि 6.53-इंच AMOLED कव्हर डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Vivo चा हा लेटेस्ट फोल्डेबल फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च झाला आहे. हे 12GB+256GB आणि 12GB+512GB या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. चीनमध्ये त्याची सुरुवातीची किंमत 9,999 युआन म्हणजेच सुमारे 1,15,000 रुपये आहे. कंपनी लवकरच हा फोन चीनबाहेर लाँच करण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल : स्वस्तात मिळतायेत 'हे' Bluetoosh Speakers, बघा यादी
Vivo X Fold+
या फोनमध्ये कंपनी 1916×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 8.03-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देत आहे. हा 2K+ इनर डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1080×2520 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53-इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले देखील आहे. त्याबरोबरच, हा फोन 12GB LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो.
याव्यतिरिक्त, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4730mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 वर आधारित OriginOS Ocean वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Dual Band Wi-Fi, Bluetooth 5.2 आणि NFC सपोर्ट सारखे पर्याय दिले आहेत.
Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये कंपनीने फोटोग्राफीसाठी चार कॅमेरे दिले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 12-मेगापिक्सेल पोर्ट्रेट शूटर आणि 8-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्सचा समावेश आहे. तर, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile