भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 Pro 5G ची पहिली Sale सुरू, 15000 रुपयांचा Discount
Vivo X Fold 3 Pro 5G स्मार्टफोनची पहिली सेल सुरु
Vivo X Fold 3 Pro 5G भारतातील पहिला स्लिम आणि सर्वात हलका स्मार्टफोन आहे.
Vivo X Fold 3 Pro 5G च्या पहिल्या सेलमध्ये 15,000 रुपयांची सूट
Vivo X Fold 3 Pro 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आजपासून या स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन भारतात या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. हा फोल्डेबल स्मार्टफोन भारतातील पहिला स्लिम आणि सर्वात हलका स्मार्टफोन आहे. बॅटरी पॅक आणि जलद चार्जिंग सपोर्टसह हा भारतातील सर्वात मोठा फोल्डेबल फोन आहे. बघुयात Vivo X Fold 3 Pro 5G ची किंमत आणि पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Also Read: बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Civi भारतात शानदार फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
Vivo X Fold 3 Pro 5G ची किंमत
Vivo च्या या नवीन Vivo X Fold 3 Pro 5G फोल्डेबल फोनची किंमत 1,59,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन सेलेस्टियल ब्लॅक कलरमध्ये आणण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 13 जून 2024 पासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू झाली आहे.
Vivo X Fold 3 Pro 5G वरील ऑफर्स
Vivo X Fold 3 Pro 5G च्या पहिल्या सेलमध्ये 15,000 रुपयांची सूट मिळत आहे. आम्ही तुम्हला सांगतो की, ही ऑफर HDFC आणि SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास ही ऑफर दिली जाईल. त्याबरोबरच, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर देखील मिळेल. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज करण्यासाठी असले तर त्यावर तुम्हाला तब्बल 60,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. Buy From Here
Vivo X Fold 3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Vivo X Fold 3 Pro 5G फोनमध्ये 8.03 इंच लांबीचा मुख्य AMOLED LTPO डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. तर, त्याचा दुसरा डिस्प्ले 6.53 इंच लांबीचा आहे. मुख्य डिस्प्ले HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो.
प्रोसेसर आणि स्टोरेज
Vivo X Fold 3 Pro 5G फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येणारा हा फोन भारतातील पहिला फोल्डेबल फोन आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Vivo X Fold 3 Pro 5G फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 64MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा दिला गेला आहे. यासह V3 इमेजिंग चिप देखील उपलब्ध आहे.
बॅटरी
Vivo X Fold 3 Pro 5G फोनमध्ये 5700mAh बॅटरी आहे. हे 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile