भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 Pro 5G लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Updated on 06-Jun-2024
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित Vivo X Fold 3 Pro 5G आज भारतीय बाजारपेठेत लाँच

Vivo X Fold 3 Pro 5G भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे.

Vivo X Fold 3 Pro 5G फोनमध्ये AI स्क्रीन ट्रान्सलेशन फीचर आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या नव्या फोल्डेबल फोनच्या लाँचबद्दल चर्चा सर्वत्र सुरु होती. त्यानंतर, अखेर Vivo X Fold 3 Pro 5G दीर्घ प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. हा भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे, असे सांगितले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या Vivo X Fold 3 Pro 5G ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Apple ची मोठी घोषणा! iPhone 15 Series मध्ये मिळतील किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स। Tech News

Vivo X Fold 3 Pro 5G भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल फोन

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo X Fold 3 Pro 5G भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल फोन आहे. स्मार्टफोनची जाडी 11.2mm आहे. फोन फोल्ड केल्यानंतर ही जाडी होईल. तर, फोन अनफोल्ड केल्यावर फोन 5.2 मिमी जाड असेल, जो खूपच स्लिम आहे. केवळ स्लिमच नाही तर हा भारतातील सर्वात हलका फोल्डेबल फोन आहे. या फोनचे वजन 236 ग्रॅम आहे.

Vivo X Fold 3 Pro 5G ची भारतीय किंमत

Vivo X Fold 3 Pro 5G फोनची किंमत 1,59,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ ऑफलाइन स्टोअरसाठी उपलब्ध आहे.

जर तुम्ही हा फोन ऑनलाईन खरेदी करणार असाल तर, तुम्हाला HDFC आणि SBI कार्डांवर 1500 रुपयांची झटपट सूट मिळेल. त्याबरोबरच, एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा दिली जाईल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 13 जूनपासून विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध होणार आहे.

Vivo X Fold 3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X Fold 3 Pro 5G फोनमध्ये 8.03 इंच लांबी मुख्य AMOLED LTPO डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोन HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो. तर, फोनचा दुसरा डिस्प्ले 6.53 इंच लांबीचा आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.

विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Armor Glass प्रोटेक्शनसह येतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये AI स्क्रीन ट्रान्सलेशन फीचर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल 5G सपोर्ट, ब्लूटूथ v5.3, WiFi-7, ड्युअल-सिम 5G क्षमता, IR ब्लास्टर आणि NFC सारखी फीचर्स आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 64MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. V3 इमेजिंग चिप देखील यामध्ये उपलब्ध आहे. तसेच, पॉवरसाठी हा फोनमध्ये 5,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिगला समर्थन करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :