फोल्डेबल स्मार्टफोनचे ट्रेंड बघता अनेक फोल्डेबल स्मार्टफोन्स बाजारपेठेत लाँच केले जात आहेत. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन देखील लवकरच भारतात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo X Fold 3 स्मार्टफोन आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे. यासह स्मार्टफोनच्या भारतीय लाँचसंदर्भात देखील एक नवीन तपशील समोर आला आहे. हा फोल्डेबल फोन भारतासह इतर बाजारपेठेत सादर केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता फोनचे सर्व तपशील बघुयात-
मिळालेल्या ताज्या अहवालानुसार, Vivo X Fold 3 लवकरच भारतात लाँच केला जाईल. हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन असेल, असे देखील बोलले जात आहे. अहवालात अद्याप फोनच्या भारतात लाँच तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vivo X Fold 2 ची जाडी 12.9 मिमी आहे. तर नव्या अहवालानुसार, नवीन स्मार्टफोनची जाडी आणखी कमी करण्यात आली आहे.
त्याबरोबरच, Vivo च्या अधिकृत लाँच घोषणेमध्ये स्मार्टफोनच्या डिझाईनबद्दल माहिती देण्यात आली आहे. फोनची बॉडी स्लिम आहे. त्याच्या मागील बाजूस एक राऊंडेड कॅमेरा मॉड्यूल आहे. तर आऊटरला मोठा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. भारतात स्मार्टफोनची लाँच डेट लवकरच जाहीर केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Vivo X Fold 3 आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आधीच उघड झाले आहेत. भारतातही हा फोन याच फीचर्ससह दाखल होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 8.03 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, फोनला 6.52 इंच लांबीचा दुसरा डिस्प्ले मिळत आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटचे अनेक व्हेरिएंट उपलब्ध आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. तर, टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्स प्रदान केले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
याव्यतिरिक्त, पॉवरसाठी फोनमध्ये 80W वायर्ड फ्लॅश फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत कंपनी भारतीय मॉडेलमध्ये काही बदल देखील करू शकते. तसेच, फोनचे कन्फर्म स्पेसिफिकेशन्स हा फोन भारतात लाँच झाल्यावरच पुढे येतील.