Vivo V9 Youth स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन झाले लीक, एंट्री-लेवल सेल्फी स्मार्टफोन च्या रुपात केला जाऊ शकतो लॉन्च

Updated on 17-Apr-2018
HIGHLIGHTS

Vivo V9 Youth Edition Vivo V9 स्मार्टफोन चा छोटा वेरिएंट असणार आहे आणि हा स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट आणि 32GB च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो.

मागच्या महिन्यात, कंपनी ने भारतात आपला प्रीमियम सेल्फी स्मार्टफोन Vivo V9 लॉन्च केला होता. आता असे वाटत आहे की या श्रेणीत एक नवीन स्मार्टफोन आणण्याचा कंपनी चा हेतू आहे. आपल्या नवीन स्मार्टफोन च्या रुपात कंपनी vivo v9 Youth लॉन्च करू शकते, हा Premium स्मार्टफोन चा एक छोटा वेरिएंट असू शकतो. 
पण विवो ने अधिकृतपणे या स्मार्टफोन च्या बाबतीत काहीच सांगितले नाही, पण याच्या स्पेक्स बद्दल इंटरनेट वर माहिती समोर आली आहे. स्लॅशलीक च्या माध्यमातून समोर आले आहे की यूथ एडिशन मध्ये एक 6.3-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल जो 2280×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह येईल. तसेच हा एक 19:9 आस्पेक्ट वाला डिस्प्ले असू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन पण दिले जाऊ शकते. 
पण या दोन्ही स्मार्टफोंस मध्ये आपल्याला चिपसेट चा फरक बघायला मिळेल. यूथ एडिशन स्नॅपड्रॅगन 450 मोबाईल प्लॅटफॉर्म वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर आपण Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन मध्ये पण बघितला आहे. 
फोन 4GB रॅम सोबत 32GB स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो, याची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, जो 16-मेगापिक्सल आणि 2- मेगापिक्सल च्या सेंसर चा एक कॉम्बो असणार आहे. फोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा पण असू शकतो. 
फोन मध्ये एक रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. हा तुम्ही शटर बटन प्रमाणे पण वापरू शकता. तसेच फोन मध्ये एक 3260mAh क्षमता असलेली बॅटरी मिळणार आहे, हा डिवाइस एंड्राइड 8.1 Oreo वर चालेल. पण अजूनही या डिवाइस ची किंमत आणि उपलब्धता या बदलया काहीच माहिती समोर आलेली नाही. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :