काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया च्या एका बिलबोर्ड वर Vivo V9 स्मार्टफोन दिसला होता, ते पाहून असे वाटत होते की Vivo लवकरच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आता कंपनी ने या सर्व रुमर्स साठी स्पष्टीकरण दिले आहे आणि यासाठी कंपनी ने एक अधिकृत टीजर पण जारी केला आहे. याचा अर्थ असा आहे की रुमर्स वर शिक्कामोर्तब झाला आहे. आणि कंपनी लवकरच आपला Vivo V9 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. gsmarena च्या माध्यमातून यासंबंधी काही माहिती मिळाली आहे.
असा अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन 22 मार्चला लॉन्च केला जाऊ शकतो, असे पण बोलले जात आहे की स्मार्टफोन notch स्क्रीन आणि AI आधारित फंक्शन्स सह लाँच केला जाऊ शकतो. तसेच भारतातील याच्या लॉन्च च्या बाबतीत असे बोलले जात आहे की याच्या चीन मधील लॉन्च च्या दुसर्या दिवशी म्हणजे 23 मार्चला हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. असे बोलले जात आहे की Vivo भारतात आपल्या या स्मार्टफोन साठी एक इवेंट करणार आहे, जिथून याला लॉन्च केले जाईल. आणि त्यातूनच याची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती मिळेल.
या स्मार्टफोन साठी जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीज नुसार. स्मार्टफोन मध्ये एक फुल-व्यू डिस्प्ले, स्लीक डिजाईन इत्यादि असणार आहे, स्मार्टफोन मध्ये एक notch पण असेल. जो याला iPhone X च्या श्रेणीत आणून ठेवेल. याव्यतिरिक्त कंपनी हा स्मार्टफोन AI आधारित दमदार फीचर्स सह लॉन्च करणार आहे. तसेच याची कॅमेरा परफॉरमेंस पण खुप चांगला असू शकतो अशी अपेक्षा आहे.
पण याच्या प्रेस नोट वरून स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल काहीच माहिती समोर आली नाही, पण असे म्हणु शकतो की हा Vivo V5 स्मार्टफोन Vivo V7 स्मार्टफोन प्रमाणे चांगल्या सेल्फी घेण्यासाठी लॉन्च करण्यात येणार आहे.
रुमर्स पाहता हा स्मार्टफोन एका 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो, जो f/2.0 अपर्चर, AR स्टीकर्स, आणि HDR सपोर्ट सह येऊ शकतो. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे आणि यात 4GB च्या रॅम सह एंड्राइड 8.1 Oreo असण्याची अपेक्षा आहे.