विवो आपल्या V9 Pro स्मार्टफोनचा 4GB रॅम वेरीएंट भारतात लॉन्च करण्यासाठी तयार आहे. रिपोर्ट नुसार Vivo V9 Pro मोबाईल फोनचा 4GB रॅम वेरीएंट भारतात 1 नोव्हेंबरला लॉन्च केला जाईल आणि हा फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव स्मार्टफोन असेल. Vivo ने V9 Pro 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह सादर केला होता आणि हा अमेझॉन इंडिया एक्सक्लूसिव मॉडेल होता.
नवीन रिपोर्ट नुसार, Vivo V9 Pro चा 4GB रॅम वेरीएंट Rs 15,990 मध्ये लॉन्च केला जाईल आणि हा 1 नोव्हेंबर 2018 पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.
डिवाइसचा 6GB रॅम वेरीएंट Rs 19,990 च्या MRP सह लॉन्च करण्यात आला होता जो अमेझॉन इंडिया वर Rs 17,990 मध्ये विकला जात आहे. डिवाइसचा 4GB रॅम वेरीएंट फ्लिपकार्ट आणि विवो-स्टोर्स वर नेबुला पर्पल आणि ब्लॅक कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध होईल.
Vivo V9 Pro स्पेसिफिकेशंस
Vivo V9 Pro चे काही स्पेसिफिकेशन आणि फीचर्स तुम्हाला आधी पाहिल्यासारखे वाटतील पण त्यात पण खूप फरक आहे. Vivo V9 Pro म्हणजे विवोच्या लेटेस्ट मोबाईलच्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.1-इंचाचा सुपर AMOLED Notch डिस्प्ले मिळत आहे. हा एका AI आधारित ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच Vivo च्या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्विक चार्ज 3.0 सोबत एक 3,260mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
विवो वी9 प्रो या लेटेस्ट मोबाईल बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला कॅमेऱ्याबद्दल पण एक खास सेटअप मिळत आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला सेल्फी इत्यादी घेण्यासाठी 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo V11 Pro स्मार्टफोन मधील सिक्युरिटी ऑप्शन्स पाहता हा डिवाइस एका इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च करण्यात आला आहे.विवो मोबाईलच्या कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 4G VoLTE सोबतच वाई-फाई 802.11, ब्लूटूथ 4.2 आणि माइक्रो USB पोर्ट पण मिळत आहे.