प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo V50 स्मार्टफोन भारतात लाँच केला. या फोनला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर सिरीजमधील इतर स्मार्टफोनशी संबंधित तपशील पुढे येत आहेत. Vivo V50e हा या सिरीजमधील पुढचा परवडणारा फोन असू शकतो. ताज्या लीक झालेल्या अहवालात, फोनचे रेंडर आणि काही फीचर्स ऑनलाइन समोर आले आहेत. या लीकमध्ये फोनची पहिली झलक आणि इतर काही तपशील उघड झाले आहेत.
Also Read: Best Offers! 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo फोनवर तब्बल 6000 रुपयांचा Discount
चिनी स्मार्टफोन निर्माता Vivo V50e लवकरच भारतात आपला आगामी स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनची संपूर्ण डिझाईन देखील उघड झाली आहे. या फोनबद्दल माहिती ऑनलाईन उघड झाली आहे. लक्षात घ्या की, Vivo V50e ची डिझाइन Vivo V50 सारखी असू शकते. या फोनमध्ये देखील तुम्हाला गोळीच्या आकाराचा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो, जो LED रिंग लाईटसह येतो.
लीकनुसार, हा फोन येत्या एप्रिल 2025 मध्ये भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. मात्र, कंपनीने या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, लीकनुसार या फोन 25 ते 30 हजार रुपयांअंतर्गत येऊ शकतो.
लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V50e स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. या डिस्प्लेचा 120Hz चा रिफ्रेश रेट उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Sapphire Blue आणि Pearl White कलर ऑप्शन्स उपलब्ध असू शकतात.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5600mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 90W फास्ट चार्जिंगसाठी उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.