Wow! Vivo V50e मध्ये मिळेल आकर्षक वेडिंग फोटोग्राफी मोड! जबरदस्त फीचर्स उघड, पहा अपेक्षित किंमत

Updated on 31-Mar-2025
HIGHLIGHTS

Vivo V50e स्वस्त फोन लवकरच भारतात लाँच होईल.

या विवो फोनद्वारे तुम्हाला पाण्याखाली फोटोग्राफी देखील करता येईल.

या विवो फोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील मिळणार आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo आपल्या लेटेस्ट Vivo V50 सिरीजचा विस्तार करत आहे. सिरीजमध्ये Vivo V50e मध्ये स्वस्त फोन लवकरच भारतात लाँच होईल. कंपनी या लाइनअपचा दुसरा फोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. नव्या फोनबद्दल महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने स्वतः त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर हे उघड केले आहे.

Also Read: Ghibli Style Photo: सोशल मीडियावर तुफान व्हायरल! ‘अशा’ प्रकारे सोप्या पद्धतीने बनवा फोटोज अगदी Free

मात्र, कंपनीने आगामी V50e स्मार्टफोनबद्दल अद्याप जास्त माहिती दिलेली नाही. हा फोन एप्रिलच्या मध्यात लाँच होण्याची शक्यता आहे. वाचा डिटेल्स-

Vivo V50e चे कन्फर्म फीचर्स

Vivo च्या मायक्रोसाईटवरून असे दिसून आले आहे की, या फोनच्या मागील बाजूस तुम्हाला वाळूसारखे टेक्स्चर मिळेल. मात्र, फोनची डिझाइन Vivo V50 सारखी असेल. यात क्वाड कर्व्ड डिस्प्ले सराउंड आणि अल्ट्रा स्लिम बेझल्स असतील. आगामी विवो स्मार्टफोन सॅफायर ब्लू आणि पर्ल व्हाइट या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाईल. तर, धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळेल. या विवो फोनद्वारे तुम्हाला पाण्याखाली फोटोग्राफी देखील करता येईल. हा फोन Sony Multifocal Pro पोर्ट्रेटला सपोर्ट करेल.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS सपोर्टसह Sony IMX882 प्रायमरी सेन्सर असेल, तर 50MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असणार आहे. विवोने पुष्टी केली आहे की या फोनचे फ्रंट आणि बॅक कॅमेरा सेन्सर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. यासोबतच फोनमध्ये वेडिंग फोटोग्राफी मोड देखील उपलब्ध असेल.

AI फीचर्स

या विवो फोनमध्ये अनेक AI फीचर्स मिळणार आहेत. या फोनमध्ये इमेज एक्सपांडर, मॅजिक इरेजर, नोट असिस्ट, ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि सर्कल टू सर्च सारखे फीचर्स मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर लीक रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हा फोन 25,000 ते 30,000 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :