अलीकडेच आगामी Vivo V30e ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यात आले आहे. आता स्मार्टफोन ब्रँड Vivo ने हा आगामी डिवाइस भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनची डिझाईन Vivo V30 सिरीजमध्ये येणाऱ्या हँडसेटपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि आकर्षक आहे. यामध्ये तुम्हाला मागील बाजूस गोल आकाराचा फ्लॅश लाइट मिळेल. हा स्मार्टफोन Xiaomi, Oppo आणि Realme सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला जबरदस्त टक्कर देईल.
Vivo ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर Vivo V30e स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन भारतात 2 मे रोजी लाँच होणार आहे. या फोनचा लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पाहता येईल.
याव्यतिरिक्त, Vivo ने अद्याप V30e च्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीक्समध्ये असा दावा केला जात आहे की, या हँडसेटची किंमत जवळपास 30 हजार रुपये असू शकते. हा फोन ग्राहकांना सिल्क ब्लू आणि वेल्वेट रेड कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.
Vivo V30e चे महत्त्वाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आधीच कंपनीच्या अधिकृत साईटवर सूचिबद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार, Vivo V30e मध्ये कर्व डिस्प्लेसह अल्ट्रा स्लिम 3D स्क्रीन असणार आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. यात 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा देखील दिला जाईल, जो Sony IMX882 सेंसर असेल. तसेच, फोन 50MP फ्रंट कॅमेरासह लाँच केला जाईल. पॉवर बाकापसाठी, फोनमध्ये 5,500 mAh बॅटरी दिली जाईल, जी 4 वर्षांच्या बॅटरी लाइफसह येऊ शकते.