Vivo चा Vivo V30e 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. नवा स्मार्टफोन Vivo V30 सिरीजमधील तिसरा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह आणण्यात आला आहे. तसेच, हँडसेट 50MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे. यामध्ये 4k फ्रंट आणि रियर व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V30e 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Amazon Great Summer Sale 2024 अखेर सर्व सदस्यांसाठी सुरु, बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सवर मिळतायेत Best डील्स
Vivo V30e 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये आणण्यात आला आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याची किंमत 27,999 रुपये आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅमसह 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 9 मे 2024 पासून सुरू होईल.
फोन आता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुक करता येईल. कंपनी या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची झटपट सूट ऑफर करत आहे. ही ऑफर फक्त HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, 2500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.
या Vivo स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, याशिवाय Vivo चा हा 5G फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजने सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी, हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, मागील बाजूस 8MP वाइड अँगल सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP आय AF कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी आहे. 5500mAh बॅटरीसह येणारा हा भारतातील सर्वात स्लिम फोन आहे.