मागील काही दिवसांपासून Vivo V30 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. आता अखेर भारतीय बाजारपेठेत आज म्हणजेच 7 फेब्रुवारी 2024 रोजी दीर्घ प्रतीक्षेनंतर ही सिरीज लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. यामध्ये Vivo V30 आणि Vivo V30 Pro चा समावेश आहे. कंपनीच्या मते ही 2024 ची सर्वात स्लिम सीरिज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आजपासून लेटेस्ट फोनचे प्री-ऑर्डर देखील सुरु झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V30 सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: OnePlus चाहत्यांची मज्जाच मजा! 16GB रॅमसह येणारा 5G फोन कायमचा हजारो रुपयांनी स्वस्त, बघा किंमत। Tech News
Vivo V30 स्मार्टफोनच्या बेस म्हणजेच 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह फोनचा व्हेरिएंट 35,999 रुपयांना आणला गेला आहे. त्याबरोबरच, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट 37,999 रुपये आहे. हा फोन अंदमान ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि पीकॉक ग्रीन या तीन कलर ऑप्शन्ससह येतो.
त्याबरोबरच, प्रो मॉडेलचा 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट 41,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. तर, 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 46,999 रुपयांना येतो. हा स्मार्टफोन अंदमान ब्लू आणि क्लासिक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये येतो. या दोन्ही फोनची विक्री 14 मार्च 2024 पासून सुरू होईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेलमध्ये ICICI आणि HDFC बँक कार्डवर 10%मिळेल. याव्यतिरिक्त, एक्सचेंज बोनसही दिला जाईल. हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट आणि लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे विकला जाईल.
या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. तर, Vivo V30 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे.
Vivo V30 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, Vivo V30 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर मिळत आहे.
Vivo V30 च्या मागील बाजूस 50MP VCS OIS मुख्य आणि 2MP पोर्ट्रेट लेन्ससह 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. यात सेल्फीसाठी 50MP कॅमेरा देखील आहे. तर, Vivo V30 Pro मध्ये OIS Sony IMX920 मुख्य कॅमेरा, 50MP AF Sony IMX816 पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP Zeiss AF कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.
Vivo V30 डिव्हाइस 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. हे 80W फ्लॅश चार्जला सपोर्ट करते. तर, Vivo V30 Pro मध्ये देखील 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. वेब सर्फिंगसारख्या बेसिक कार्यांसह ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.