Vivo V30 सीरीजची भारतीय लाँच टाइमलाईन जाहीर, दोन अप्रतिम स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये होणार का लाँच? Tech News

Vivo V30 सीरीजची भारतीय लाँच टाइमलाईन जाहीर, दोन अप्रतिम स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये होणार का लाँच? Tech News
HIGHLIGHTS

कंपनीची लेटेस्ट Vivo V30 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार

सीरिज अंतर्गत Vivo V30 आणि Vivo V30 Pro स्मार्टफोन समाविष्ट

आगामी Vivo V30 सिरीजचे दोन्ही स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होण्याची शक्यता

Vivo ने नुकतेच आपली लेटेस्ट V30 सिरीज आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केली आहे. त्यानंतर, आता या सिरीज अंतर्गत समाविष्ट असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, या सीरिज अंतर्गत Vivo V30 आणि Vivo V30 Pro भारतात लाँच होऊ शकतात. चला तर मग आगामी स्मार्टफोन्सबाबत पुढे आलेल्या सर्व लीक्सची माहिती सविस्तर बघुयात-

हे सुद्धा वाचा: 16GB RAM सह OnePlus 12R ची सेल भारतात सुरु, पहिल्या सेलमध्ये होतोय Best ऑफर्सचा वर्षाव। Tech News

Vivo V30 सिरीज भारतीय लाँच टाइमलाईन

लीकनुसार, आगामी Vivo V30 सिरीजचे दोन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये लाँच केले जाऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी सुद्धा सांगण्यात आली आहे ती म्हणजे Vivo V30 सिरीज ZEISS कॅमेरा लेन्सने सुसज्ज असू शकते. जे विशेषतः भारतीय बाजारपेठेसाठी सादर केले जाईल.

Vivo V30 series with ZEISS co-engineered camera system could launch in India next month: Know more

लक्षात घ्या की, आत्तापर्यंत हा ब्रँड आपल्या हाय रेंज डिव्हाइसेसमध्ये या प्रकारचा कॅमेरा देत आहे. त्यामुळे लीकवर विश्वास ठेवला तर, या मिड-बजेट फोन्समध्ये ZEISS लेन्स मिळणे, युजर्ससाठी एक खास गोष्ट असेल.

Vivo V30 सिरीजचे लीक स्पेक्स

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo V30 सिरीजचे दोन मोबाईल चीनमध्ये लाँच केले गेले आहेत, ज्यात Vivo V30 आणि Vivo V30 Lite यांचा समावेश आहे. त्याबरोबरच, आता नवीन मॉडेल Vivo V30 Pro लवकरच येऊ शकते. अलीकडेच आलेल्या लीकवर विश्वास ठेवला तर, Vivo V30 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीची AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हा मोबाईल Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह सज्ज असू शकतो.

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानासह 50MP OmniVision OV50E सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा आणि पोर्ट्रेट सेन्सर आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ऑटोफोकससह 50MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo