Limited Time Deal! Vivo V40 लाँचपूर्वी Vivo V30 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध, पहा ऑफर 

Limited Time Deal! Vivo V40 लाँचपूर्वी Vivo V30 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध, पहा ऑफर 
HIGHLIGHTS

आगामी फोन Vivo V40 सिरीज भारतात येत्या 7 ऑगस्ट रोजी लाँच होणार

नवी फोन लाँचपूर्वी कंपनीने आपल्या विद्यमान Vivo V30 5G फोनची किंमत कमी केली आहे.

HDFC, SBI आणि ICICI क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे डिस्काउंट देखील उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताचा आगामी फोन Vivo V40 सिरीज भारतात येत्या 7 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. या अंतर्गत Vivo V40 आणि Vivo V40 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले जातील. हे नवीन स्मार्टफोन्स बाजारात लाँच करण्यापूर्वी कंपनीने आपल्या विद्यमान Vivo V30 5G फोनची किंमत कमी केली आहे. या Vivo फोनच्या किमतीत 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याबरोबरच, अधिक सवलती देखील उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि डिस्काउंट-

Also Read: पॉवरफुल फीचर्ससह Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo V30 5G ची नवी किंमत

Vivo V30 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजरात उपलब्ध आहे. 8GB RAM सह 128GB मेमरी वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आणि 256 B व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये होती. कपातीनंतर, या दोन व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी कमी झाली आहे. तर, 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत, जी पूर्वी 37,999 रुपये होती, ती आता 35,999 रुपयांवर आली आहे.

Vivo V40 लाँचपूर्वी Vivo V30 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध

त्याबरोबरच, तुम्हाला 3,600 रुपयांपर्यंतची सूटही दिली जात आहे. म्हणजेच Vivo V40 भारतीय लाँचपूर्वी Vivo V30 स्मार्टफोन 5,600 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Vivo.in वर बँक कार्ड डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

Vivo V30 5G 8+128 व्हेरिएंटवर 3,200 रुपये आणि 8+256 वर 3,400 रुपयांची सूट मिळत आहे. तर, फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेल 12+256 वर 3,600 रुपयांची सूट दिली जात आहे. लक्षात घ्या की, ही सवलत ऑफर 31 ऑगस्टपर्यंत चालेल, ज्याचा लाभ घेण्यासाठी HDFC, SBI आणि ICICI क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

Vivo V30 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Vivo V30 फोन 6.78-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एक AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. OIS फीचर्ससह 50MP चा मुख्य सेन्सर आणि मागील पॅनलवर 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, पॉवरसाठी, या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo