Price Cut! 50MP कॅमेरासह येणारा Vivo V30 फोनच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवी किंमत 

Price Cut! 50MP कॅमेरासह येणारा Vivo V30 फोनच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवी किंमत 
HIGHLIGHTS

Vivo च्या नवीन Vivo V30 5G फोनच्या किमतीत कपात

Vivo V30 फोनच्या दरात कंपनीने 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Vivo V30 फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेराचा सपोर्ट देण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपल्या चाहत्यांना दिवाळी भेट देत लोकप्रिय फोन Vivo V30 5G च्या किमतीत कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo V30 फोनच्या दरात कंपनीने 2,000 रुपयांची कपात केली आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला होता. यामध्ये तुम्हाला 50MP मेन कॅमेरासह 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V30 फोनची नवी किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: अप्रतिम AI फीचर्ससह Infinix Zero Flip भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

vivo-v30-5g
Vivo V30

Vivo V30 ची नवी किंमत

Vivo V30 5G फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर या फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, या फोनचा 8GB+ 256GB व्हेरिएंट 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. अखेर, फोनचा टॉप म्हणजेच 12GB रॅम व्हेरिएंट 33,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा Vivo 5G फोन पीकॉक ग्रीन, अंदमान ब्लू आणि क्लासिक ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Vivo V30 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V30 5G फोन 6.78-इंच लांबीच्या FHD+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटवर कार्य करेल. उत्तम कार्यक्षमतेसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB विस्तारित रॅम तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅम आहे, जी व्हर्च्युअल रॅमसह 24GB पर्यंत वाढवता येते. तसेच, हा फोन 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. तुम्ही Amazon वरून हा फोन नव्या किमतीत खरेदी करू शकता. येथे क्लिक करा

vivo-v30-5g-specs

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 50MP चा मुख्य सेन्सर आणि 50MP अल्ट्रा अँगल लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या बॅटरीसह हा फोन मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवतो.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलियेट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo