हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात मिळेल.
ह्याच वर्षी भारतात विवो V3 स्मार्टफोन लाँच झाला होता आणि आता अशी बातमी मिळत आहे की, ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत जवळपास ३००० रुपयांची घट झाली आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत लाँच वेळी १७,८९० रुपये होती आणि आता हा स्मार्टफोन ही घट केल्यानंतर १४,८९० रुपयात मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात मिळेल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD 720p IPS डिस्प्ले दिली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz स्नॅपड्रॅगन 616 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. ह्यात आपल्याला 3GB ची रॅमसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.