विवो V3 च्या किंमतीत झाली ३००० रुपयांची घट

विवो V3 च्या किंमतीत झाली ३००० रुपयांची घट
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात मिळेल.

ह्याच वर्षी भारतात विवो V3 स्मार्टफोन लाँच झाला होता आणि आता अशी बातमी मिळत आहे की, ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत जवळपास ३००० रुपयांची घट झाली आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत लाँच वेळी १७,८९० रुपये होती आणि आता हा स्मार्टफोन ही घट केल्यानंतर १४,८९० रुपयात मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात मिळेल.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD 720p IPS डिस्प्ले दिली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz स्नॅपड्रॅगन 616 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. ह्यात आपल्याला 3GB ची रॅमसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

 

हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो आणि ह्यात आपल्याला 2550mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.

हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…

ह्या फोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – अॅप्पल आयफोन 7 ची आणखी काही फोटोज झाले ऑनलाइन लीक
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo