Price Cut! Powerful फीचर्ससह येणाऱ्या Vivo V29e फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

Price Cut! Powerful फीचर्ससह येणाऱ्या Vivo V29e फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo V29e फोन भारतात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आला होता.

आता 6 महिन्यांनंतर कंपनीने Vivo V29e फोनची किंमत कायमची कमी

कंपनीने फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे.

Vivo कंपनीने अगदी स्टायलिश लुकसह Vivo V29e स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने Vivo V29e स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा फोन भारतात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आला होता. आता 6 महिन्यांनंतर कंपनीने या फोनची किंमत कायमची कमी केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V29e फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F15 5G Price: 12GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Affordable 5G फोन भारतात लाँच, बघा किंमत। Tech News

Vivo V29e ची नवी किंमत

Vivo V29e कंपनीने गेल्या वर्षी 26,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी ठेवली होती. मात्र, फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये होती. आता कंपनीने फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे.

Vivo V29e 5g
Vivo V29e

कपातीनंतर Vivo V29e फोनचे 128GB मॉडेल 25,999 रुपयांना उपलब्ध झाले आहे. तर, 256GB मॉडेल 27,999 रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन आर्टिस्टिक रेड आणि आर्टिस्टिक ब्लू कलर ऑप्शन्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo V29e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V29e स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर काम करतो. विशेष म्हणजे फोनच्या मागील बाजूस कलर चेंजिंग पॅनल देण्यात आले आहे, जे यूव्ही लाइटिंगमध्ये ब्लॅक आणि कलर ऑप्शन्समध्ये बदलते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासोबत OIS सपोर्ट उपलब्ध आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo