Vivo ने आपली Vivo V29 सीरीज भारतात अखेर लाँच केली आहे. गेल्या बऱ्याच कालावधीपासून या सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Vivo V29 सीरीजचे हे दोन्ही फोन स्लीक आणि स्टायलिश डिझाइनमध्ये सादर करण्यात आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात लेटेस्ट सिरीज तुमच्या बजेटमध्ये येईल का?
Vivo V29 स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्यतिरिक्त 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किमंत 32,999 रुपये आणि हाय व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, Vivo V29 Proच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर, फोनचे 12GB रॅम आणि 256GB मॉडेल अनुक्रमे 42,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे.
Vivo V29 आणि Vivo V29 Pro स्मार्टफोन आजपासूनच भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लक्षात घ्या की, Vivo V29 Pro स्मार्टफोन 10 ऑक्टोबरला विक्रीसाठी जाईल. तसेच, Vivo V29 ची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
Vivo V29 Pro हा हिमालयन ब्लू कलरमध्ये फ्लोटिंग माउंटन टेक्सचर बॅक पॅनलसह लॉन्च करण्यात आला आहे. तथापि, Vivo V29 मध्ये रंग बदलणारे बॅक पॅनल आहे.
Vivo V29 आणि Vivo V29 Pro दोन्ही फोन 6.78-इंच लांबीच्या कर्व AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहेत, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Vivo V29 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Vivo V29 Pro फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.
याव्यतिरिक्त, Vivo V29 4,600mAH बॅटरीने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. तर, Vivo V29 Pro मध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात वाय-फाय ते ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्टपर्यंत सर्व काही आहे.
अखेर इंटरेस्टिंग फिचरकडे येत, Vivo V29 मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो OIS सह येतो. याव्यतिरिक्त, या फोनमध्ये 8MP वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP बोकेह लेन्स आहे. तर, Vivo V29 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 12MP पोर्ट्रेट लेन्स आणि 8MP वाइड अँगल लेन्स देखील आहेत. दोन्ही फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी तुम्हाला 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल.