digit zero1 awards

Launching Confirm! Vivo V29 सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, बजेटमध्ये असेल का Price? Tech News

Launching Confirm! Vivo V29 सिरीज ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, बजेटमध्ये असेल का Price? Tech News
HIGHLIGHTS

Vivo V29 सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro यांचा समावेश आहे.

लीक्सनुसार, या फोनची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

ही सिरीज आधीच जागतिक बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Vivo V29 सिरीज भारतात कधी लाँच होणार? याबाबत बरेच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर कंपनीने स्मार्टफोनची लाँच डेट अधिकृतपणे जाहीर केली आहे. मायक्रोसाइटनुसार, Vivo V29 सिरीज भारतात 4 ऑक्टोबर रोजी लाँच होईल. या सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro यांचा समावेश आहे. लीक्सनुसार, या फोनची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. ही सिरीज आधीच जागतिक बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Vivo V29 आणि Vivo V29 Pro ची अपेक्षित तपशील

डिझाईन

Vivo V29 आणि Vivo V29 Pro ची बॉडी विशेष 3D पार्टीकल डिझाइनसह येईल. त्याची जाडी 7.46 मिमी आणि वजन 186 ग्रॅम असेल. हा स्मार्टफोन तीन कलर पर्यायांमध्ये म्हणजेच हिमालयन ब्लू, मॅजेस्टिक रेड आणि स्पेस ब्लॅक मध्ये येऊ शकतो.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Vivo V29 च्या जागतिक आवृत्तीमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट, 1.5K रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्टसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 778G SoC उपलब्ध आहे. यात Android 13 वर आधारित Funtouch OS आहे.

Upcoming Vivo V29 Series

स्टोरेज आणि बॅटरी

ग्लोबल Vivo V29 मध्ये 128GB किंवा 256GB स्टोरेज दिले जाऊ शकते. यासोबत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले जाईल. तसेच, 12GB रॅम वेरिएंट देखील दिले जाईल. प्रो व्हेरियंटमध्येही हाच प्रकार दिला जाईल. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 80W चार्जिंगसह 4600mAh बॅटरी आहे.

कॅमेरा

Vivo V29 Pro बद्दल बोलायचे झाले तर, यात Sony IMX663 सेन्सर आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेलचा असू शकतो. यामध्ये ऑरा लाइटसह नाईट पोर्ट्रेट आणि बोकेह इफेक्ट देण्यात येणार आहे. Vivo V29 बद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगचा 50 मेगापिक्सेल ISOCELL GN5 सेन्सर यात दिला जाऊ शकतो. यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo