digit zero1 awards

Vivo चा आगामी स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरासह भारतात लवकरच होणार लाँच, येईल जबरदस्त सेल्फी

Vivo चा आगामी स्मार्टफोन 50MP फ्रंट कॅमेरासह भारतात लवकरच होणार लाँच, येईल जबरदस्त सेल्फी
HIGHLIGHTS

या सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro स्मार्टफोन लाँच

फोनमध्ये भारतापासून प्रेरित कलर्स असणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

या फोनमध्ये भारत-विशेष स्पेक्स देखील असणार आहेत.

काही आठवड्यांपूर्वीच Vivo ने आपला Vivo V29e स्मार्टफोन भारतात लाँच केला होता, हा स्मार्टफोन काही जबरदस्त स्पेक्स आणि डिझाइनसह लॉन्च करण्यात आला होता. दरम्यान, Vivo आपली Vivo V29 सीरीज भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस Vivo V29 सिरीज भारतात लॉन्च होणार आहे. 

 Vivo V29 सिरीज भारतात विशेष स्पेक्ससह होणार लाँच  

vivo v29 and vivo v29 pro

होय, या सिरीजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro स्मार्टफोन लाँच होणार आहेत. फोनमध्ये भारतापासून प्रेरित कलर्स असणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. इतकंच नाही तर Vivo V29 Pro स्मार्टफोन भारतात-एक्सक्लुझिव्ह म्हणून लाँच होणार आहे. एका रिपोर्टनुसार, Vivo V29 स्मार्टफोन मॅजेस्टिक रेड कलरमध्ये लाँच होणार आहे. या फोनमध्ये भारत-विशेष स्पेक्स देखील असणार आहेत. म्हणजेच या फोनमध्ये जे स्पेक्स असतील ते फक्त भारतासाठी उपलब्ध असतील. भारताबाहेरील देशांमध्ये फोन वेगवेगळ्या स्पेक्सवर लाँच केले जाऊ शकतात. 

एका अहवालातून, Vivo V29 आणि Vivo V20 Pro च्या लाँच टाइमलाइनचा खुलासा झाला आहे. खरं तर, Vivo V29 आणि Vivo V29 pro स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस लाँच केले जाऊ शकतात. मात्र, कंपनीने अद्याप या फोनचे स्पेसिफिकेशन उघड केले नाहीत. मात्र, लॉन्च होण्यापूर्वी या फोन्सबद्दल अधिक माहिती समोर येईल. 

 Vivo V29 (Global Verient) चे तपशील 

vivo v29 and vivo v29 pro

Vivo V29 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर गेमिंग आणि इतर ग्राफिक्स-केंद्रित कार्यांसाठी चांगली कामगिरी देतात. Vivo V29 स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे, यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. 

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो OIS सह येतो. एवढेच नाही तर फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर आहे. या फोनमध्ये 50MP चा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. याशिवाय फोन 4600mAh बॅटरीने सुसज्ज आहे, हा 80W फास्ट चार्जिंगवर चालतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo