digit zero1 awards

Vivo V29 लाँच झाल्यानंतर लगेच बंपर Discount सह उपलब्ध, 50MP कॅमेरासह मिळतील अनेक अप्रतिम बेनिफिट्स। Tech News 

Vivo V29 लाँच झाल्यानंतर लगेच बंपर Discount सह उपलब्ध, 50MP कॅमेरासह मिळतील अनेक अप्रतिम बेनिफिट्स। Tech News 
HIGHLIGHTS

तुम्ही सध्या Vivo V29 बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Vivo V29 5G वर फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत.

फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Vivo V29 5G काही काळापूर्वीच म्हणजे अलिडकेच भारतीय बाजारात लाँच झाला आहे. तुम्हीही लेटेस्ट स्मार्टफोनच्या शोधात असाल तर खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण तुम्ही सध्या Vivo V29 बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. पण यासाठी तुम्हाला काही बँक ऑफर्सचा लाभ घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हा फोन खूपच स्वस्तात मिळेल. Flipkart वर हा स्मार्टफोन सवलतीसह उपलब्ध आहे. बघुयात सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy Z Flip5 5G वर 7,000 रुपयांचा Discount, स्वस्तात खरेदी करण्याची हीच संधी। Tech News

vivo v29 smartphone series

Vivo V29 5G ची किंमत आणि ऑफर्स

तुम्ही Flipkart वरून Vivo V29 5G चा 128GB + 8GB RAM व्हेरिएंट सवलतीसह खरेदी करू शकता. हा फोन तुम्ही 32,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. Flipkart Axis Bank कार्डने पैसे भरून तुम्ही 5% कॅशबॅक मिळवू शकता.

त्याबरोबरच, जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेता येईल. फोनच्या बदल्यात तुम्हाला 31,500 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र, पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान उत्तम स्थितीमध्ये असण्याची शक्यता आहे. येथून खरेदी करा

Vivo V29 Sale in India
Vivo V29 Sale in India

Vivo V29 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V29 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4600 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo