Vivo च्या जबरदस्त 5G फोनच्या किमतीत घट, का खरेदी करावा हा फोन ?

Vivo च्या जबरदस्त 5G फोनच्या किमतीत घट, का खरेदी करावा हा फोन ?
HIGHLIGHTS

Vivo V27 5G भारी सवलतीसह खरेदी करा.

एक्सचेंज ऑफरसह तुम्हाला संपूर्ण 29,000 रुपयांची सूट मिळेल.

या सर्व ऑफर्स तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळणार आहेत.

Vivo कंपनी कमी किमतीत उत्तम फीचर्स देणारे स्मार्टफोन्स नेहमीच बाजारात आणत असते. Vivo V27 5G हा स्मार्टफोन बऱ्याच महत्त्वाच्या फीचर्ससह येणारा फोन आहे. तुमच्यासाठी हा फोन उत्तम पर्याय ठरेल की नाही? याबद्दल आम्ही तुम्हला माहिती देणार आहोत. 

तसेच, फोनवर कुठे आणि कुठले डिस्काउंट ऑफर्स आहेत, हे देखील जाणून घेऊयात :  

Vivo V27 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Vivo V27 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची MRP फ्लिपकार्टवर 36,999 रुपये आहे. मात्र, साईटवर हा फोन 10% सवलतीसह केवळ 32,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळणार आहे. त्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण 29,000 रुपयांची सूट मिळेल. मात्र, या ऑफरचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. 

त्याबरोबरच, यासोबत काही बँक ऑफर्स देण्यात आले आहेत. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने पे केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला त्वरित 2 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. अशाप्रकारे तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. 

हा फोन का खरेदी करावा? 

या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स फोनला अप्रतिम बनवतात. जसे की, या फोनमध्ये 6.78 Full HD+AMOLED डिस्प्ले मिळेल. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 5G प्रोसेसर दिला गेला आहे. याव्यतिरिक्त फोनला पॉवर देण्यासाठी 4600 mAh ची बॅटरी यात मिळेल. कॅमेरा स्पेसीफिकेक्शन्समध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, फ्रंट कॅमेरा देखील 50MP चा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo