Vivo V25 Pro : नव्या स्मार्टफोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Updated on 25-Aug-2022
HIGHLIGHTS

Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच

नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 35,999 रुपये

फोन आकर्षक ऑफर्ससह फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध

Vivo V25 Pro गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला आहे. आज म्हणजेच 25 ऑगस्टपासून भारतात फोनची विक्री सुरू झाली आहे. Vivo V25 Pro साठी पूर्वीच्या प्री-ऑर्डर घेतल्या जात होत्या. Vivo V25 Pro च्या पहिल्या सेलमध्ये फोनसोबत विशेष सूटही दिली जात आहे. ही ऑफर फक्त HDFC बँक कार्डधारकांसाठी आहे. Vivo V25 Pro ची भारतात सुरुवातीची किंमत 35,999 रुपये आहे. Vivo V25 Pro भारतात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : Oppo ने लाँच केले 28 तास टिकणारे इयरबड्स, किंमत 1800 रुपयांपेक्षा कमी

Vivo V25 Pro 5G

Vivo V25 Pro 5G प्रीमियम डिझाईनमध्ये लाँच करण्यात आला आहे. Android 12 आधारित Funtouch OS 12 फोनमध्ये उपलब्ध आहे. Vivo V25 Pro 5G मध्ये 6.56-इंच लांबीचा फुल HD + AMOLED 3D कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये डायमेन्सिटी 1300 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज आहे. फोनमध्ये प्रोटेक्शनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील समर्थित आहे.

Vivo V25 Pro 5G मध्ये 4,830mAh बॅटरी आहे, जी 66W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी Vivo V25 Pro 5G मध्ये 5G, 4G, GPS, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.2 आणि टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स देखील मिळू शकतात.

Vivo V25 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स आहे, दुसरा 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आहे. फोनवरून कमी लाइटमध्ये देखील शार्प इमेजेस क्लिक केल्या जाऊ शकतात, असा कंपनीचा दावा आहे. कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशनला देखील सपोर्ट करतो. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V25 Pro ची किंमत

Vivo V25 Pro ची विक्री Flipkart आणि Vivo India च्या ऑनलाइन स्टोअरद्वारे केली जात आहे. 8 GB रॅम असलेल्या फोनच्या 128 GB स्टोरेजची किंमत 35,999 रुपये आणि 256 GB स्टोरेजसह 12 GB रॅमची किंमत 39,999 रुपये आहे. Vivo V25 Pro प्युअर ब्लॅक आणि सेलिंग ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल. तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असल्यास तुम्हाला 3,500 रुपयांची झटपट सूट मिळेल. फोनसोबत 20,000 रुपयांपर्यंतचा  एक्सचेंज ऑफरही आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :