विराट कोहलीच्या हातात दिसला Vivo S15 Pro, पुढील महिन्यात Vivo V25 म्हणून भारतात होणार लाँच

Updated on 28-Jul-2022
HIGHLIGHTS

Vivo S15 Pro भारतात Vivo V25 नावाने लाँच होणार

विराट कोहलीच्या हातात दिसतोय डिव्हाईस

अलीकडेच, Vivo S15 Pro चीनमध्ये लाँच झाला

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली Vivo स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून आले. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Vivo S15 Pro सारखा दिसतो. Vivo S15 Pro पुढील महिन्यात V25e आणि V25 Pro सह Vivo V25 नावाने भारतात लाँच होऊ शकतो. हा क्रिकेटपटू भारतातील Vivo चा ब्रँड अँबेसेडर आहे. विराट हे ही फोटो  ट्विटरवर 'My favourite shade of blue' या कॅप्शनसह पोस्ट केले आहे. हा फोन अजून भारतात लाँच झालेला नाही. जर Vivo V25 खरोखरच S15 Pro चे रिब्रँडेड वर्जन असेल, तर पुढील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. 

हे सुद्धा वाचा : तुमचे आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेणार OnePlus चे नवीन स्मार्टवॉच, किंमतही कमी 

VIVO S15 PRO SPECS

Vivo S15 Pro चीनमध्ये उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.56-इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले मिळत आहे. फोनचा साईज 8.6mm आणि वजन 188 ग्रॅम आहे.

डिव्हाईसच्या बाजूंना थिन बेझल्स देण्यात आले आहेत. S15 Pro MediaTek Dimensity 8100 chip द्वारे समर्थित असेल आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह पेयर केला जाईल. 

 

https://twitter.com/imVkohli/status/1551956168469147648?ref_src=twsrc%5Etfw

 

Vivo S15 Pro Android 12 वर आधारित Origin OS वर काम करते. फोनमध्ये OIS सह 50MP मेन कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळू शकतो.

फोनच्या पुढील बाजूस 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे, जो पंच-होल कटआउटमध्ये उपलब्ध आहे. S15 Pro मध्ये ड्युअल स्पीकर आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरचा सपोर्ट आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळत आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :