Vivo ने आज भारतात नवीन Vivo V25 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन Vivo V25 5G स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात लाँच झालेल्या Vivo V25 Pro प्रमाणेच डिझाइनसह दिसतोय. स्मार्टफोनमध्ये 50MP Eye AF सेल्फी कॅमेरा, 64MP OIS नाईट कॅमेरा आहे. फोन कलर बदलणाऱ्या फ्लोराईट एजी बॅक पॅनलसह प्रीमियम डिझाइनसह येतो.
हे सुद्धा वाचा : जुही चावलाच्या 'Hush Hush' वेब सीरिजचा ट्रेलर बघितला का? अभिनेत्रीचे OTT वर पदार्पण
नव्याने लाँच झालेला Vivo V25मध्ये स्मार्टफोन वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले डिझाईन आहे. यात 6.44-इंच स्क्रीन आहे, जी फुल HD + रिझोल्यूशनवर कार्य करते. ही AMOLED स्क्रीन आहे, जी 90Hz वर रिफ्रेश होते. हे MediaTek Dimensity 900 SoC द्वारे समर्थित आहे.
त्याबरोबरच, फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये, 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. कॅमेरा ऍपमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट, स्लो मोशन, टाइम-लॅप्स, व्लॉग मूव्ही आणि ड्युअल व्ह्यू यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी समोर 50-मेगापिक्सेल सेन्सर आहे.
हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB + 128GB ची किंमत 27,999 रुपये आणि 12GB + 256GB ची किंमत 31,999 रुपये आहे. Vivo V25 फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2022 मध्ये विकले जाईल. खरेदीदार ICICI बँक, ऍक्सिस बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर 10% झटपट सूट मिळवू शकतील.
याशिवाय खरेदीदार स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतील. Vivo V25 5G रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि इतर ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. जे स्मार्टफोनची प्री-बुकिंग करत आहेत, त्यांना ICICI बँक किंवा SBI बँक कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळू शकेल.