50MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, फ्लिपकार्ट सेलमध्ये लाँच होणार

50MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, फ्लिपकार्ट सेलमध्ये लाँच होणार
HIGHLIGHTS

Vivo V25 5G फ्लिपकार्ट सेलमध्ये लाँच

नवीन फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा असेल

नवीनतम फोनची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही

काही दिवसांपूर्वी चीनी कंपनी Vivo ने आपली V25 सीरीज लाँच केली होती, ज्यात Vivo V25 5G आणि Vivo V25 Pro स्मार्टफोन्सचा समावेश आहे. प्रो मॉडेलची विक्री फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे, परंतु स्टॅंडर्ड 5G मॉडेल अद्याप भारतात लाँच व्हायचे आहे. खुशखबर अशी आहे की, Vivo V25 5G फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान लाँच केला जाईल. म्हणजेच लॉन्च झाल्यामुळे ग्राहकांना या फोनवर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटचा लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : 'या' तारखेपासून Amazon Great Indian Festival sale 2022, मोबाईल-टीव्ही वर मिळेल प्रचंड सवलत

फ्लिपकार्ट मायक्रोसाइटवर असे पाहिले जात आहे की, Vivo V25 5G स्मार्टफोन लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होईल, जरी त्याची विक्री तारीख अद्याप उघड झाली नाही. फोनचा रंग, डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन या महिन्याच्या अखेरीस फ्लिपकार्टवर होणाऱ्या सेलमध्ये सूचीबद्ध केला जाईल. 

नवीन फोन 50MP सेल्फी कॅमेरासह येईल

Vivo च्या नवीन स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पावरफुल कॅमेरा सिस्टम आणि नवीन फोन 50MP सेल्फी कॅमेरासह लाँच होऊ शकतो. कंपनीने या सेल्फी कॅमेऱ्यात ऑटोफोकस व्हिडिओ फीचर देखील समाविष्ट केले आहे. फोनमध्ये मागील पॅनेलवर 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा उपलब्ध होणार आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. फोनची किंमत अद्याप समोर आलेली नाही.

Vivo V25 5G 

Vivo V25 5G स्मार्टफोनमध्ये 6.44-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशन व्यतिरिक्त 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह या फोनमध्ये 6nm MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 128GB बेस इंटरनल स्टोरेज मिळू शकते. मात्र, या फोनमध्ये स्टोरेज वाढवण्याचा पर्याय दिला जाणार नाही. नवीन डिवाइस मध्ये कंपनी 4,500mAh ची मोठी बॅटरी देणार आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo