या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट पण या डिवाइस सोबत मिळत आहे
गेल्याच महिन्यात Vivo ने भारतीय स्मार्टफोन बाजारात त्यांचा Vivo U10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन आतापर्यंत लिमिटेड सेल साठी उपलब्द होता. पण आता कंपनी हा मोबाईल फोन ओपन सेल मध्ये विकणार आहे. याचा अर्थ असा कि आता हा मोबाईल फोन जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही किंवा फ्लॅश सेलची वाट भागावी लागणार नाही. हा मोबाईल फोन आता ओपन सेल मध्ये कधीही विकत घेण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
Vivo U10 6.35 इंचाच्या HD+ IPS डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे आणि डिवाइस दोन रंगांत इलेक्ट्रिक ब्लू आणि थंडर ब्लॅक ऑप्शन्स सादर केला जात आहे. तसेच फोन मध्ये 5000mah ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Smartphone क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665AIE प्रोसेसर द्वारा संचालित केला गेला आहे आणि गेमिंग परफॉरमेंस वाढवण्यासाठी फोन मध्ये अल्ट्रा गेम मोडचा पण समावेश करण्यात आला आहे, सोबतच फोन मध्ये डार्क मोड पण मिळत आहे. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर AI ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा सेंसर पण यात आहे. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo U10 ची किंमत 8,990 रुपयांपासून सुरु होते जी 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरीएंट साठी आहे. त्याचबरोबर 3GB+64GB वेरीएंटची किंमत 9,990 रुपये तर 4GB+64GB वेरीएंटची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे.