Vivo T4 5G Specs India launch timeline price range and specs leaked
शीर्षस्थानी असलेल्या स्मार्टफोन्स कंपन्यांपैकी एक Vivo ने अलीकडेच भारतात Vivo T4x 5G फोन लाँच केला आहे. दरम्यान, कंपनी लवकरच भारतात या सिरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Vivo T4 5G असण्याची शक्यता आहे. ताज्या लीकमध्ये या फोनशी संबंधित अनेक तपशील लीक झाले आहेत, ज्यामध्ये लाँच टाइमलाइन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात संपूर्ण लीक तपशील-
Also Read: AI फीचर्ससह नवी itel Unicorn Max स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये?
वर सांगितल्याप्रमाणे, Vivo T4 5G फोनशी संबंधित अधिक माहिती पुढे आली आहे. लीक रिपोर्टनुसार, हा फोन पुढील महिन्यात म्हणजेच येत्या एप्रिलमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. तसेच, या फोनची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
आगामी फोनच्या लीक तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, या Vivo फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. त्याबरोबरच, उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम, 12GB रॅम आणि स्टोरेज 128GB, 256GB स्टोरेज पर्याय मिळतील.
याव्यतिरिक्त, लीकनुसार, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. यासोबत 2MP चा सेकंडरी कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. फोनची बॅटरी 7300mAh असू शकते, ज्यासह 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, या फोनची योग्य किंमत, संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच झाल्यावर किंवा कंपनीने अधिकृतपणे जाहीर केल्यानंतरच पुढे येतील.