Price Cut! जबरदस्त Vivo T3x 5G फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Updated on 03-Jan-2025
HIGHLIGHTS

कंपनीने Vivo T3X गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लाँच केला गेला होता.

Vivo T3x 5G च्या किमतीत एकूण 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Vivo स्मार्टफोन निर्माता मागील वर्षीच्या भारतातील टॉपच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी आहे. कंपनीने अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केला आहेत. सध्या कंपनीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन Vivo T3x 5G भारतीय बाजारपेठेत स्वस्त केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo T3X गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लाँच केला गेला होता. हा फोन कंपनीने मिड बजेटमध्ये सादर केला आहे. मात्र, आता हा फोन कमी किमतीत खरेदी करता येईल. यात 6000mAh बॅटरी, 128GB स्टोरेज आणि 50MP कॅमेरा यांसारखी उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध आहेत. पहा यादी-

Also Read: आगामी POCO X7 Pro च्या लाँचपूर्वीच किंमत जाहीर! Powerful फीचर्ससह लवकरच होणार भारतात दाखल

Vivo T3x 5G च्या नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo T3x 5G च्या किमतीत एकूण 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. Vivo T3x 5G भारतात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कपातीनंतर, स्मार्टफोनच्या 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 12,499, 13,999 आणि 15,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Vivo T3x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo T3x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा HD Plus LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, Vivo T3x 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झल्यास, या हँडसेटमध्ये 8GB पर्यंत रॅम आहे. याचे अंतर्गत स्टोरेज 128GB स्टोरेज आहे, जे 1TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, ग्लोनास, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स आहेत.

vivo t3x

फोटोग्राफीसाठी, Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तसेच, यात LED फ्लॅश लाईट आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, यात 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :