6000mAh बॅटरीसह सर्वात स्लिम स्मार्टफोन Vivo T3x 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Updated on 17-Apr-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट स्मार्टफोन Vivo T3x 5G भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.

HDFC आणि SBI कार्डांवर 1500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर फोनची विक्री 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी सुरू होईल.

Vivo चा लेटेस्ट स्मार्टफोन Vivo T3x 5G भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन जंबो बॅटरीसह आणला आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. नावावरून समजलेच असेल की, हा स्मार्टफोन Vivo T2x 5G चा सक्सेसर म्हणून लाँच केला गेला आहे. जाणून घ्या Vivo T3x 5G फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: OnePlus Power up Days: महागडे स्मार्टफोन्स प्रचंड Discount सह खरेदी करा, हजारो रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी। Tech News

Vivo T3x 5G ची भारतीय किंमत

Vivo T3x 5G फोनची किंमत 13,499 रुपयांपासून सुरू होते. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे आणि दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. तर, फोनचा दुसरा व्हेरिएंट 14,999 रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट 16,499 रुपयांना सादर करण्यात आला आहे. कंपनीने सेलेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन ब्लिस या दोन कलर ऑप्शन्समध्ये स्मार्टफोन लाँच केला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर फोनची विक्री 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC आणि SBI कार्डांवर 1500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

Vivo T3x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo T3x 5G या फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह येतो. सुरक्षिततेसाठी, स्मार्टफोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग देण्यात आली आहे.

Vivo T3x 5G battery details confirmed

फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये LED फ्लॅश देखील उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या युजर्ससाठी हा स्मार्टफोन अप्रतिम ठरतो. पॉवरसाठी या 5G स्मार्टफोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 6000mah बॅटरी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :