Vivo T3X 5G स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित झाली आहे.
हा फोन भारतात 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल.
या फोनची मायक्रोसाइट देखील Flipkart वर LIVE झाली आहे.
Vivo चा आगामी स्मार्टफोन Vivo T3X 5G स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित झाली आहे. हा कंपनीचा नवीन 5G स्मार्टफोन असणार आहे. मागील बऱ्याच कालावधीपासून या फोनबाबत अनेक लीक समोर येत आहेत. त्यानंतर आता अखेर कंपनीने आपल्या आगामी Vivo T3X 5G फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. होय, कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवरून या फोनचे लॉन्चिंग डिटेल्स सांगितले.
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Vivo India च्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलद्वारे Vivo T3X 5G स्मार्टफोनच्या भारतीय लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. तसेच, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, हे देखील सांगितले गेले आहे. त्याबरोबरच, या फोनची मायक्रोसाइट देखील Flipkart वर LIVE झाली आहे.
Vivo T3X 5G Flipkart लिस्टिंग
फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत. त्याबरोबरच, कंपनी Vivo T3X 5G फोन 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऑफर करेल, हे देखील सांगितले गेले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T3X 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. याशिवाय, फोन Snapdragon 6 Gen 1ने सुसज्ज असू शकतो. पाण्याच्या संरक्षणासाठी IP64 रेटिंग असणे अपेक्षित आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo T3X 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी असेल, ज्यासह 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान केला जाईल. येत्या काळात फोनचे इतर फीचर्स देखील उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची खरी किमंत आणि फीचर्ससह इतर सर्व तपशील फोन लाँच झाल्यानंतरच कन्फर्म होतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.