digit zero1 awards

Price Cut! Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro 5G च्या किमतीत तब्बल 6000 रुपयांची कपात, पहा नवी किंमत 

Price Cut! Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro 5G च्या किमतीत तब्बल 6000 रुपयांची कपात, पहा नवी किंमत 
HIGHLIGHTS

Vivo च्या लोकप्रिय Vivo T3 सिरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात

Vivo T3 Ultra 5G आणि Vivo T3 Pro 5G च्या किमतीत कपात

कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती तब्बल 6000 रुपयांची कपात केली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या लोकप्रिय Vivo T3 सिरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. होय, Vivo T3 Ultra 5G आणि Vivo T3 Pro 5G च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हे Vivo स्मार्टफोन तब्बल 12GB पर्यंत RAM सह येतात. कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती तब्बल 6000 रुपयांची कपात केली आहे. जाणून घेऊयात Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro 5G फोनच्या नव्या किमती-

Also Read: लेटेस्ट POCO X7 सिरीजची भारतात पहिली सेल आज, जाणून किंमत आणि Best ऑफर्स

vivo t3 ultra 5g
vivo t3 ultra 5g

Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro 5G ची नवी किंमत

कपातीनंतर Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 35,999 रुपयांऐवजी 29,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यात 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह फोनचा दुसरा व्हेरिएंट आता 31,999 रुपयांना उपलब्ध होईल. अखेर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या डिव्हाइसच्या टॉप वेरिएंटची किंमत आता 33,999 रुपये इतकी झाली आहे.

तर, दुसरीकडे कपातीनंतर Vivo T3 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची नवीन किंमत 22,999 रुपये झाली आहे. त्याच्या दुसऱ्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये झाली आहे. लक्षात घ्या की, नवीन किमतींसह फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Vivo T3 Pro 5G
Vivo T3 Pro 5G confirmed to launch tomorrow in India

Vivo T3 Pro 5G

Vivo T3 Pro 5G फोनच्या मुख्य स्पेसीफिएक्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा फुल HD AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट 5500mAh बॅटरीसह येतो. याशिवाय दोन्ही स्मार्टफोन्सवर अप्रतिम ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

Vivo T3 Ultra

Vivo T3 Ultra स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या अल्ट्रा फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि HDR10 आहे. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Dimensity 9200 प्रोसेसरसह येतो. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 50MP सेल्फी कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo