Vivo ने या V सीरीजच्या नव्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे.
आगामी Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच केला जाईल.
आगामी फोनची मायक्रो वेबसाईटही देखील Flipkart वर लाईव्ह
Vivo ने अलीकडेच Vivo T3 Ultra चे भारतीय लाँच टीज केले होते. त्यानंतर, आज अखेर Vivo ने या V सीरीजच्या नव्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. आगामी फोनची मायक्रो वेबसाईटही देखील Flipkart वर लाईव्ह करण्यात आली आहे. यावरून, हा सेगमेंटचा वेगवान कर्व डिस्प्ले स्मार्टफोन आहे, असे देखील समजते. Vivo T3 Ultra फोनची भारतीय लाँच डेट आणि इतर तपशील-
Vivo T3 Ultra 5G ची भारतीय लाँच डेट
आगामी Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच केला जाणार आहे. होय, हा फोन पुढिल्या आठवड्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजेच 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लक्षात घ्या, या फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Vivo T3 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo T3 Ultra 5G चे खास फीचर्स Flipkart पेजवरून समोर आले आहेत. या फोनमध्ये 1.5k रिझोल्यूशनसह 6.78 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. या फोनला पाणी आणि धुळीपासून वाचवण्यासाठी तब्बल IP68 रेटिंग देखील मिळाली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह येईल. तर, सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा असेल, फोनमध्ये Aura Light फीचर दिले जाईल.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo T3 Ultra 5G फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरसह येईल. Vivo च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची बॅटरी दिली जाईल. हे 80W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येईल. हा फोन 0.758 अल्ट्रा स्लिम असेल. फोनमध्ये 12GB रॅमसोबत 12GB व्हर्चुअल रॅम देण्यात येईल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.