Vivo T3 Lite 5G: Vivo ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Vivo T3 Lite 5G ची भारतात लाँच केला होता. फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 4 जुलै 2024 रोजी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु होणार आहे. होय, तुम्ही आज दुपारी 12 पासून हा स्मार्टफोन सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. या सेलदरम्यान फोनवर कॅशबॅकपासून इन्स्टंट डिस्काउंटपर्यंत सर्वप्रकारचे ऑफर्स दिले जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo T3 Lite 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स सविस्तरपणे जाणून घेऊया.
Vivo T3 Lite 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, त्याचे टॉप मॉडेल म्हणजे 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 11,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला 500 रुपयांची बँक सूट मिळणार आहे. तर, 651 रुपयांचा मासिक EMI देखील मिळेल.
नवीनतम Vivo T3 Lite स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. वर सांगितल्याप्रमाणे, फोन दोन व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये अंतर्गत स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर उपलब्ध आहे. याशिवाय हँडसेटमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP सह 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. यात पोर्ट्रेट, फोटो, पॅनो, टाइम-लॅप्स आणि स्लो-मो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा मोबाइल फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, मोबाईल फोनमध्ये 5000mAh ची जम्बो बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अखंड कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये 4G, ड्युअल सिम स्लॉट, 5G, Wi-Fi, GPS, FM, OTG, NFC आणि USB टाइप-C पोर्ट आहे.