5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Vivo T3 Lite 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स

5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Vivo T3 Lite 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स
HIGHLIGHTS

Vivo ने Vivo T3 Lite 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे.

Vivo T3 Lite 5G फोन Xiaomi, Oppo आणि Realme स्मार्टफोन्सना देईल जबरदस्त स्पर्धा

Vivo T3 Lite 5G ची विक्री 4 जुलै 2024 पासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरू होईल.

Vivo T3 Lite 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo T3 Lite 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo T3 Lite 5G च्या आगमनाने, Xiaomi, Oppo आणि Realme सारख्या कंपन्यांच्या बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन्सना जबरदस्त स्पर्धेला सामोरे जावे लागेल. विशेषतः या फोनमध्ये तुम्हाला कमी किमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसारखी पॉवरफुल फीचर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo T3 Lite 5G ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: आगामी CMF Phone 1 च्या लाँचपूर्वीच Price Leak! जाणून घ्या कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत

Vivo T3 Lite 5G ची भारतात किंमत

Vivo T3 Lite 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत फक्त 10,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, या फोनच्या 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 11,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 500 रुपयांची सूट मिळेल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटची विक्री 4 जुलै 2024 पासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरू होईल. हा स्मार्टफोन व्हायब्रंट ग्रीन आणि मॅजेस्टिक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये देखील खरेदी करता येईल.

Vivo T3 Lite 5G चे टॉप 5 फीचर्स

डिस्प्ले: Vivo T3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. त्याबरोबरच, डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1612 × 720 पिक्सेल आहे, ज्याची ब्राईटनेस 840 nits आहे. यासह सुरक्षेसाठी, Vivo ने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर प्रदान केले आहे.

प्रोसेसर: सुरळीत कामकाजासाठी, हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह, फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. यासह इंटर्नल स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

vivo t3 lite 5g

कॅमेरा: Vivo चा नवीन स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी लेन्स आणि दुसरी 2MP मिळणार आहे. तर, सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये नाइट, पोर्ट्रेट, फोटो, पॅनो, टाइम-लॅप्स आणि स्लो-मो सारखे मोडदेखील उपलब्ध आहेत.

बॅटरी: Vivo T3 Lite मध्ये पॉवरसाठी 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. हे 15W फास्ट चार्जिंगच्या मदतीने चार्ज केले जाऊ शकते.

कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी, या हँडसेटमध्ये 5G, 4G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, FM, OTG, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo