नुकतेच Vivo T3 5G स्मार्टफोनची भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर या फोनची पहिली विक्री देखील सुरु झाली आहे. होय, गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झालेला हा स्मार्टफोन पहिल्या सेलमध्ये डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी असेल. Vivo च्या या नवीन 5G फोनमध्ये 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह 8GB रॅम आहे. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत आणि पहिल्या सेलमध्ये मिळणारे ऑफर्स-
Vivo T3 5G ची पहिली विक्री आज म्हणजेच 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. Vivo T3 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात येतो. डिस्काउंटसह, फोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केला जाऊ शकतो. होय, फोनवर पहिल्या सेलदरम्यान ऑफर्स मिळत आहेत.
8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये HDFC आणि SBI बँक कार्डवर 2000-2000 रुपयांची सूट मिळेल. या फोनमध्ये कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल फ्लेक असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Vivo T3 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जायचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर देण्यात आला आहे. MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर कार्यप्रदर्शन आणि उर्जा कार्यक्षमतेचा सर्वोत्तम संयोजन ऑफर करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यासह वापरकर्त्यांना उत्तम बॅटरी लाईफसह प्रभावी कामगिरीचा अनुभव घेता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ड्युअल सिम स्लॉट, ब्लूटूथ आणि ऑडिओ जॅक सारखे फीचर्स आहेत.
या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा आहे. तर, पॉवरसाठी हँडसेटमध्ये 44W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोन स्टिरीओ स्पीकरने सुसज्ज आहे. हा हँडसेट Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालतो.