50MP मेन कॅमेरासह लेटेस्ट Vivo T3 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स। Tech News
Vivo चा नवीनतम Vivo T3 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच
स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या विशेष किमतीत लाँच केला गेला आहे.
पहिल्या सेलमध्ये फोनवर HDFC बँक आणि ICICI बँक कार्डवर सूट उपलब्ध
Vivo चा नवीनतम Vivo T3 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती, अखेर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Vivo T सीरीजच्या इतर स्मार्टफोन्सप्रमाणे हे अधिकृत वेबसाइट तसेच लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart द्वारे देखील विकले जाईल. हा स्मार्टफोन अनेक व्हेरियंट आणि कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात Vivo T3 5G स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Amazon iQOO Quest Days: प्रसिद्ध कंपनीच्या फोनवर मिळतोय प्रचंड Discount, बघा Best ऑफर्स। Tech News
Vivo T3 5G ची भारतात किंमत
Vivo T3 5G दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याचा 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. त्याबरोबरच, 256GB स्टोरेज असलेल्या फोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल फ्लेक या फोन कलर ऑप्शन्ससह येईल.
Vivo T3 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या विशेष किमतीत लाँच केला गेला आहे. Flipkart वर 27 मार्च 2024 पासून स्मार्टफोनची विक्री सुरू होईल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. त्याबरोबरच, पहिल्या सेलमध्ये फोनवर HDFC बँक आणि ICICI बँक कार्डवर अनुक्रमे 2000-2000 रुपयांची सूट मिळेल.
Vivo T3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Display
स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. तर, पिक्सेल रिझोल्यूशन 2400 X 1080 असेल आणि पीक ब्राइटनेस 1800 nits असेल.
Processor
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम असून 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
Camera
फोटोग्राफीसाठी Vivo T3 5G च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP Sony IMX882 OIS सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP टेलिफोटो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.
Battery
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 44W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, ड्युअल सिम स्लॉट, ब्लूटूथ आणि ऑडिओ जॅक सारखे फीचर्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile