Vivo T3 5G स्मार्टफोनची लाँच डेट कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून आपल्या आगामी 5G फोनच्या लाँचला टीज करत होती. अखेर या फोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहे. त्याची मायक्रो वेबसाईट Flipkart वर लाईव्ह करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रोसेसरपासून ते बॅटरीपर्यंत अनेक स्पेसिफिकेशन्स लॉन्च होण्यापूर्वीच समोर आले आहेत. चला तर मग बघुयात तपशील-
हे सुद्धा वाचा: Paytm च्या ‘या’ सेवा आजपासून बंद! FASTag, UPI आणि वॉलेटबाबत नवे नियम जारी, ग्राहकांसाठी झाले मोठे बदल| Tech News
Vivo India ने आपल्या अधिकृत X खात्यावरून ट्विट करून फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. Vivo T3 5G स्मार्टफोन 21 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. Flipkart पेजनुसार या फोनमध्ये Mediatek Dimensity प्रोसेसर उपलब्ध असेल. मात्र, या चिपचे नाव अद्याप पुढे आलेले नाही. या प्रोसेसरसह येणारा सेगमेंटमधील हा पहिला फोन असेल. याव्यतिरिक्त, यात OIS सपोर्ट असलेला कॅमेरा असेल, असेही पेजवरून समोर आले आहे.
लीकनुसार, या Vivo फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. सुरळीत कामकाजासाठी हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 SoC सह लॉन्च केला जाऊ शकतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे.
याव्यतिरिक्त, फोनच्या मागील बाजूस 50MP कॅमेरा उपलब्ध असेल. त्याबरोबरच, यात 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो, जो 44W FlashCharge ला सपोर्ट करेल. लीकनुसार, हा फोन हँडसेट क्रिस्टल फ्लेक आणि कॉस्मिक ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये येऊ शकतो.