Vivo ने Vivo T2x हा नवीन स्मार्टफोन देशांतर्गत बाजारात लाँच केला आहे. Vivo T2x हा Vivo च्या T-Series चा नवीन सदस्य आहे. Vivo T1x गेल्या वर्षी लाँच झाला होता आणि हा नवीन फोन त्याचीच अपग्रेडेड आवृत्ती आहे. Vivo T2x सह नॉच डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हाच सेटअप Vivo T1x मध्ये देखील देण्यात आला होता. Vivo T2x मध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह 6000mAh बॅटरी मिळेल. हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे. चला तर जाणून घेऊयात, नवीन स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
Vivo ने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन दोन वेरीएंटमध्ये आणण्यात आला आहे. फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 1,699 युआन म्हणजेच सुमारे 19,700 रुपये आहे. त्याच प्रमाणे, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,899 युआन म्हणजेच सुमारे 22,000 रुपये आहे. हा फोन मिस्ट ब्लू आणि मिरर ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. हा फोन चीनमधील JD.com वर लिस्ट झाला आहे. भारतात त्याच्या उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
Vivo T2x मध्ये Android आधारित OriginOS आहे. Vivo T2x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, जो 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फ्रंट सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देखील देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. यात 6000mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोन 6W रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo T1x स्मार्टफोनची अपग्रेडेड आवृत्ती आहे.
या फोनमध्ये 6.58-इंच लांबीचा IPS LCD फुल एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2408 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20.07:9 आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Octa-core MediaTek Dimensity 900 प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.