नवीनतम स्मार्टफोन Vivo T2 Pro 5G ची सेल आज होणार सुरु, ‘या’ Special Offersसह खरेदी करा। Tech News 

नवीनतम स्मार्टफोन Vivo T2 Pro 5G ची सेल आज होणार सुरु, ‘या’ Special Offersसह खरेदी करा। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo T2 Pro ची पहिली विक्री आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून Flipkart आणि Vivo च्या ई-स्टोअरवर सुरू होईल.

ICICI बँक आणि Axis बँक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची त्वरित सूट

फोटोग्राफीसाठी यात 64MP OIS प्रायमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे.

Vivo T2 Pro 5G गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, आज प्रथमच हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी जात आहे. भारतातील Vivo T2 Pro ची पहिली विक्री आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून Flipkart आणि Vivo च्या ई-स्टोअरवर सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo T2 Pro या सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केला आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहे. चला तर मग वेळ न घालवता बघुयात फोनची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Vivo T2 Pro 5G ची किंमत आणि सेल ऑफर्स

VIVO T2 PRO 5G

Vivo T2 Pro स्मार्टफोनच्या 8GB/128GB मॉडेलची सुरुवातीची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशन तुम्ही 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ICICI बँक आणि Axis बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे Vivo चा हा नवीन हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. हा फोन तुम्हाला मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड शेडमध्ये खरेदी करता येईल.

Vivo T2 Pro 5G

Vivo T2 Pro 5G फोन कर्व एजसह 6.78-इंच लांबीच्या FHD+ AMOLED डिस्प्ले पॅनेलसह येतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 चिपसेटसहा सुसज्ज आहे. यात 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज मिळेल. हे उपकरण Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर कार्य करते. या डिव्हाइसला पाण्यापासून संरक्षणासाठी IP52 रेटिंग देखील देण्यात आली आहे. तर, सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर देखील समाविष्ट आहे.

Vivo T2 Pro मध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ऑप्टिक्ससाठी, तुम्हाला स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक ड्युअल-कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 64MP OIS प्रायमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फी घेण्यासाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.3, WiFi 6, GPS, 4G, 5G आणि USB Type-C पोर्ट इ. पर्याय देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo