Vivo T-Series स्मार्टफोन्सच्या यशानंतर कंपनीने आणखी एक डिव्हाइस या सिरीजमध्ये समाविष्ट केले आहे. होय, Vivo T2 Pro 5G स्मार्टफोनच्या लाँचसह ब्रँडने 5G सेगमेंटमधील वापरकर्त्यांना एक नवीन गिफ्ट दिले आहे. कंपनीने फोनसह अनेक भारी फीचर्स बजेट रेंजमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. नव्या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरू होणार आहे. चला बघुयात किमंत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
कंपनीने Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये बाजारात लाँच केला आहे. डिव्हाइसच्या 8GB रॅम + 128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मोबाईल न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड या दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, 29 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मोबाईलची विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा HD Plus 3D Curve AMOLED डिस्प्ले आहे, ज्यासह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, परफॉर्मन्ससाठी या नवीन हँडसेटमध्ये MediaTek Dimension 7200 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. Mediatek Dimensity 7200 चिपसेट मध्य-श्रेणी विभागातील गेमर्ससाठी एक उत्कृष्ट पर्याय म्हणून उदयास आला आहे, जो गेमिंग उत्साहींसाठी अप्रतिम फीचर्स प्रदान करतो.
डिव्हाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. यात 64MP प्राइमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हे 2MP बोकेह लेन्ससह येते. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे. फोनमध्ये 4600 mAh बॅटरी बसवण्यात आली आहे, त्यासह 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.