प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo आपल्या T-Series चा नवीनतम स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने 22 सप्टेंबर रोजी Vivo T2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय लाँचबाबत माहिती दिली आहे. विवोने आगामी फोनच्या लाँचसाठी मीडियालाही आमंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच इव्हेंटला सुरुवात होईल.
https://twitter.com/Vivo_India/status/1701470169636442399?ref_src=twsrc%5Etfw
अलीकडेच Vivo द्वारे X म्हणेजच Twitter वर एक टीझर जारी करण्यात आला आहे, या टीझरनुसार फोनमध्ये एक कर्व एज डिस्प्ले असणार आहे. स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइन देखील असणार आहे. यामध्ये फोनचा कॅमेरा देखील दिसतोय. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी आणला जाणार आहे.
जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर ते भारतात सुमारे 24,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडील ऑनलाइन लीक सूचित करते की, Vivo T2 Pro 5G स्मार्टफोनमध्ये Octa-Core MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर असणार आहे. Mediatek चिपसेट हा एक्सट्रीम लेव्हल स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही गेमर असल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसमधील चिपसेटसह खरोखरच चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा करू शकता. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या कॅमेरा स्पेक्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
त्याबरोबरच, हा Vivo फोन किती रॅम आणि स्टोरेज मॉडेल्समध्ये येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडेल असू शकतात. हा फोन Android 13 वर लॉन्च होणार आहे, तो Vivo च्या FunTouchOS 13 स्किनवर येऊ शकतो. याव्यतिरिक्त, Vivo च्या Vivo T2 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 4600mAh बॅटरी असणार आहे, जी 66W रॅपिड चार्जिंगसह सुसज्ज असू शकते.